COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : वीरेंद्र सेहवागची तडाखेबाज फलंदाजी आपण पाहिली असेल, वीरेंद्र सेहवाग नेहमीच स्वतंत्रपणे खेळला, टेस्ट क्रिकेटच्या महत्वाच्या खेळाडूंमध्ये सेहवागचंही नाव घेतलं जातं.


टेस्ट क्रिकेटमध्ये बॅटसमन नेहमीच संयम ठेऊन खेळतो, पण वीरेंद्र सेहवागने नेहमीच आधीपासून टेस्टमध्येही फटकेच लगावले आहेत.


वीरेंद्र सेहवागवर टीका यासाठी होत होती की, तो आपले पाय न वळवता फक्त हात आणि डोळ्याचा ताळमेळ बसवून चेंडूला ब्रॉण्ड्री दाखवत होता.


या नझफगडच्या नवाबाने सर्व टीकाकारांना शांत बसवलं कारण, त्याने पाकिस्तान विरोधात टेस्ट सामन्यात तृतीय शतक करून इतिहास रचला, यानंतर तो मुल्तानचा सुल्तान म्हणून प्रसिद्ध झाला.