मुंबई: टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. या पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये धोनीला तु रिटायर कधी होणार असा प्रश्न विचारण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रश्नानंतर धोनीनं पत्रकाराला आपल्या बाजूला बोलावलं, आणि उलट प्रश्नच विचारायला सुरुवात केली. मी तुला आता फिट दिसतोय का ? मी अजूनही धावू शकतो असं तुला वाटतं का ? मी 2019 पर्यंत खेळू शकतो असं तुला वाटतं का ? असे प्रश्न धोनीनं विचारले. 


या सगळ्या प्रश्नांची उत्तर पत्रकारानं हो अशी दिली. तेव्हा तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, असं धोनी म्हणाला. 


हा प्रश्न मला भारतीय पत्रकारानं विचारला असता तर तुझा मुलगा किंवा भाऊ विकेट किपर आहे का जो भारतासाठी खेळू शकतो, असं उत्तर मी दिलं असतं असं धोनी म्हणाला. 


रिटायरमेंटच्या प्रश्नावर धोनीचं उत्तर


 

ICC WT20 2016

Captain MS Dhoni turns the tables - gets a journalist to answer his query on retirement plans.

Posted by Indian Cricket Team on Thursday, March 31, 2016