युवराजच्या चाहत्यांसाठी खुशखबर!
नवी दिल्ली : सनरायजर्स हैदराबादचा स्टार फलंदाज युवराज सिंग दुखापतीतून सावरत असून यंदाच्या हंगामात सहा मेला होणाऱ्या गुजरात लायन्ससंघाविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार असल्याचे युवराजने सांगितलेय.
युवराजला टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. यामुळेच वर्ल्डकपमध्ये तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. तसेच आयपीएलच्या या हंगामात त्याला हैदराबादच्या तीन सामन्यांत खेळता आले नाही.
सहा मे रोजी होणाऱ्या सामन्यात खेळण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असेल. मला आशा आहे की तोपर्यंत मी फिट होईन. मी कालच डॉक्टरांशी बातचीत केली. मला आशा आहे की मी खेळू शकेन, असे युवराजने एका कार्यक्रमात सांगितले.
हैदराबादने आतापर्यंतच्या तीनपैकी दोन सामन्यात पराभव तर एका सामन्यात विजय मिळवलाय. युवराजच्या मते अनुभवी आशिष नेहराच्या समावेशाने हैदराबाद संघ समतोल झालाय.
युवराजच्या चाहत्यांसाठी खुशखबर!