शेवटच्या दोन टेस्टसाठी भारतीय संघात एक बदल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उरलेल्या दोन टेस्ट मॅचसाठी हार्दिक पांड्याला भारतीय टीममधून डच्चू देण्यात आला आहे.
बंगळुरू : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उरलेल्या दोन टेस्ट मॅचसाठी हार्दिक पांड्याला भारतीय टीममधून डच्चू देण्यात आला आहे. पुढच्या दोन्ही टेस्ट मॅचसाठी हा एकच बदल भारतीय संघात करण्यात आला आहे.
भारताचे दोन्ही ओपनर मुरली विजय आणि के.एल.राहुल यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे मुरली विजयला बंगळुरू टेस्टला मुकावं लागलं होतं. मुरली विजयऐवजी अभिनव मुकुंदचा संघात समावेश करण्यात आला होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्यी तिसरी टेस्ट १६ मार्चपासून रांचीमध्ये तर चौथी टेस्ट २५ मार्चपासून धर्मशालामध्ये होणार आहे. पुण्याची टेस्ट ऑस्ट्रेलियानं जिंकल्यानंतर बंगळुरू टेस्टमध्ये भारतानं विजयी कमबॅक केलं.
असा असेल शेवटच्या दोन टेस्टसाठी भारताचा संघ
विराट कोहली(कॅप्टन), मुरली विजय, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, रवीचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, वृद्धीमान सहा, इशांत शर्मा, उमेश यादव, जयंत यादव, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद