हाशिमनं आमलानं महिला अँकरला कपडे बदलायला भाग पाडलं!
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हाशिम आमलानं आपली मुलाखत घेण्यासाठई एका भारतीय टीव्ही अँकरला कपडे बदलायला भाग पाडलंय.
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हाशिम आमलानं आपली मुलाखत घेण्यासाठई एका भारतीय टीव्ही अँकरला कपडे बदलायला भाग पाडलंय.
एबीपी लाईव्ह.इन या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय आमलाची एका भारतीय महिला अँकर मुलाखत घेणार होती. यावेळी तीनं शॉर्ट ड्रेस आणि लो-नेक असलेला एक टॉप परिधान केला होता.
यावर, नाराज झालेल्या हाशिम आमलानं महिलेचा पोशाख योग्य नसल्याचं सांगत मुलाखत देण्यास नकार दिला... आणि त्यानं आपल्या या काही अटी आयोजकांसमोर मांडल्या. यानंतर संबंधित महिला अँकरला कपडे बदलून येण्यास आयोजकांकडून सांगण्यात आलं.
जर्सीवर मद्याच्या जाहिरातीला नकार
मुस्लिम धर्माचा कट्टर अनुयायी असलेला हाशिम आमला मुळचा गुजरातचा... याआधीही त्यानं आपल्या जर्सीवर 'कास्टल' बीअरची जाहिरात झळकावण्यास नकार दिला होता. यासाठी तो ५०० डॉलरचा फाईन भरायलाही तयार झाला होता.
'दहशतवादी' म्हणून उल्लेख
२००६ मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी बॅटसमन डिन जोन्सनं टीव्ही कमेन्टेटेर म्हणून काम करताना हाशिम आमलाचा उल्लेख 'दहशतवादी' म्हणून केला होता. याची भरपाई म्हणून त्याला 'टेन स्पोर्टस'मधून आपल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं होतं.