रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट धोनीच्या होमटाऊन अर्थातच रांचीमध्ये रंगणार आहे. बंगळुरुमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता कोहली अँड कंपनी सीरिजमध्ये विजयी आघाडी घेण्याच्या उद्देशानचं मैदानात उतरतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टीव्हन स्मिथच्या डीआरएस वादानंतर आता रांचीत क्रिकेटवर भर देण्याचा दोन्ही टीमचा प्रयत्न असेल. भारतीय टीममध्ये दुखापतीतून सावरलेल्या मुरली विजयचं कमबॅक होण्याची दाट शक्यता आहे. तर ऑस्ट्रेलियन टीममध्ये मिचेल स्टार्कऐवजी पॅट कमिन्सचा समावेश होण्याची चर्चा आहे.


दोन्ही टीम्स विजयासाठी उत्सुक असल्यानं क्रिकेटप्रेमींसाठी ही मॅच एक पर्वणीच ठरणार आहे. त्याचप्रमाणे पुणे आणि बंगळुरुनंतर रांचीचं पिच कसं असणार याबाबतची उत्सुकताही क्रिकेट चाहत्यांना आहे.