मुंबई : चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडनं केलेल्या 400 रनना भारतानंही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं 146 रनच्या मोबदल्यात एक विकेट गमावली होती. दिवसाच्या शेवटी मुरली विजय नाबाद 70 रनवर तर चेतेश्वर पुजारा नाबाद 47 रनवर खेळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा स्कोअर 39 रनवर असताना ओपनर के.एल.राहुल 24 रनवर आऊट झाला. मोईन अलीनं भारताला हा झटका दिल्यानंतर मात्र विजय आणि पुजारानं भारताचा डाव सावरला.


त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव 400 धावांत आटोपला. इंग्लंडने काल टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या कीटोन जेनिंग्न्सने 112 धावांची खेळी केली. पदार्पणाच्या सामन्यात त्याने शतक झळकावले.


जॉस बटलरनेही 76 धावा झळकावल्या. जोस आणि जेनिंग्न्सच्या जबरदस्त खेळीमुळे इंग्लंडला पहिल्या डावात 400 धावांचा पल्ला गाठता आला. भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या.


तर रवींद्र जडेजाने चार विकेट घेत गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत सध्या 2-0 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याच्या दृष्टीने भारताला पहिल्या डावात मोठी खेळी करणे गरजेचे आहे.