चेन्नई : चेन्नई टेस्टमध्ये भारताच्या करुण नायरनं विश्वविक्रम केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या या पाचव्या टेस्टमध्ये करुण नायरनं शानदार त्रिशतक झळकावलं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा करुण नायर हा दुसरा भारतीय ठरला आहे. करुण नायरनं 381 बॉलमध्ये नाबाद 303 रन केल्या. करुण नायरच्या या खेळीमध्ये 32 फोर आणि चार सिक्सचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करुण नायरच्या आधी भारताच्या वीरेंद्र सेहवागनं दोन त्रिशतकं झळकावली आहेत. सेहवागनं पहिलं त्रिशतक पाकिस्तानविरुद्ध मुलतानमध्ये तर दुसरं त्रिशतक झळकावलं होतं.


याआधी टेस्ट क्रिकेटमध्ये सेहवागनं दोन, क्रिसे गेलनं दोन, लारानं दोन आणि मॅथ्यू हेडननं एक त्रिशतक झळकावलं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये ब्रॅन लारानं केलेल्या 400 रन्स हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक स्कोअर आहे. करुण नायरनं मारलेलं हे त्रिशतक टेस्ट क्रिकेटमधलं तिसावं त्रिशतक आहे.