भारत पहिल्या दिवशी 9 बाद 291
ऐतिहासिक 500वा कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर 9 बाद 291 धावा केल्यात.
कानपूर : ऐतिहासिक 500वा कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर 9 बाद 291 धावा केल्यात. मुरली विजय(65), चेतेश्वर पुजारा(62), आर. अश्विन(40) व्यतिरिक्त एकाही खेळाडूला साजेशी कामगिरी करता आली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रवींद्र जडेजा 16 आणि उमेश यादव 8 धावांवर खेळत होता.