मुंबई: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाईटरायडर्समध्ये वानखेडे स्टेडियमवर मॅच होत आहे. या मॅचमध्ये मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या मोसमातली वानखेडे स्टेडियमवरची मुंबईची ही शेवटची मॅच आहे. त्यामुळे रोहितची टीम मुंबईतला आपला शेवट गोड करण्यासाठी मैदानात उतरेल.   


महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यामुळे न्यायालयानं राज्यात होणाऱ्या मॅच बाहेर खेळवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता मुंबईच्या वानखेडेवर होणाऱ्या मॅच राजस्थानमधल्या जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहेत. 


पॉईंट्स टेबलमध्ये कोलकता नाईटरायडर्स 8 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुंबई सहा पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मुंबईला टॉप 3 मध्ये यायची चांगली संधी आहे. 


पाहा मॅचचा लाईव्ह स्कोअर