पुणे : क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सर्वात यशस्वी कर्णधार ठरला असला तरी सध्या पुणे सुपरजाईंट संघात मात्र त्याचा जाणून-बुजून अपमान होतोय की काय? असंच चित्र समोर येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेंद्रसिंग धोनी आणि पुणे सुपरजायंट टीमच्या मॅनेजमेंटमध्ये दरी वाढताना दिसतेय. याचंच ताजं उदाहरण दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध पुणे मॅच दरम्यान पाहायला मिळालं. 


पुण्याचा कॅप्टन स्टिव्हन स्मिथ या मॅचमध्ये खेळला नाही. तेव्हा त्याच्या ऐवजी धोनीला डावलून अजिंक्य राहाणेला कॅप्टन म्हणून मैदानात उतरवण्यात आलं... आणि या मॅचमध्ये पुण्याला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. हा धोनीच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरलाय. 


या मॅचमध्ये धोनीला कॅप्टन्सी का देण्यात आली नाही? धोनीला कॅप्टन्सीसाठी विचारणा करण्यात आली होती का? करण्यात आली होती तर धोनीनंच त्यासाठी नकार दिला का? असे अनेक प्रश्न धोनीच्या फॅन्सच्या मनात निर्माण झालेत.