धोनीचा तो हेलिकॉप्टर शॉट आणि विजय
इंडियन प्रीमियर लीगमधील किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात खेळताना रायजिंग पुणे सुपरजायंटचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने ग्रेट फिनिशर म्हणून स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध केले.
विशाखापट्टणम : इंडियन प्रीमियर लीगमधील किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात खेळताना रायजिंग पुणे सुपरजायंटचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने ग्रेट फिनिशर म्हणून स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध केले.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर आपल्या स्टाईलने हेलिकॉप्टर शॉट लगावत संघाला विजय मिळवून दिला आणि स्पर्धेचा शेवट गोड केले.
पुण्याला जिंकण्यासाठी अखेरच्या षटकांत २३ धावा हव्या होत्या. पहिल्या चेंडूत एकही धाव काढता आली नाही. दुसरा चेंडू वाईड मिळाल्याने पाच चेंडूत २२ धावा करायच्या होत्या. दुसऱ्या चेंडूत धोनीने खणखणीत षटकार लगावत विजयाच्या दिशेने पाऊल टाकले.
त्यानंतर चौथ्या चेंडूत त्याने चौकार लगावला. त्यानंतर मात्र शेवटच्या दोन चेंडूत सलग दोन षटकार ठोकर धोनीने सामना संपवला आणि संघाला विजयी भेट दिली. धोनीचा हा खेळ पाहता ग्रेट फिनिशर असल्याचे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले.