मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली हा सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याला रोखणं अनेक बॉलर्सला कठिण आहे. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी त्याच्याबद्दल सर्वकाही सांगून जाते त्यामुळे विराट कोहलीला ऱोखायचं कसं याचा विचार विरोधी टीम करत असतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये जर मुंबई आणि बंगळुरु हे दोन टीम एकमेकांसमोर आले तर विराट कोहलीला रोखण्यासाठी आमच्याकडे रणनिती असल्याचं स्पिनल हरभजन सिंग याने म्हटलं आहे. विराटने आयपीएलमध्ये आत्तापर्यत या सीजनमध्ये सर्वाधिक ८६५ रन्स केले आहे. 


हरभजन म्हणतो की, 'कोहली एक महान खेळाडू आहे. सध्या तो एका वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे. त्याला बॅटींग करतांना पाहिलं तर असं वाटतं की तो एक वेगळीच लीग खेळतोय. मुंबईकडे विराटला रोखण्यासाठी वेगळी रणनिती आहे. आम्ही याआधी विराटला २ वेळा आऊट करत विजय मिळवला होता '


विराटचं कौतूक करत हरभजन बोलला की, पुढच्या १० वर्षात तो भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाणार आहे. मागील ३-४ वर्षापासून मी त्याच्यासोबत आहे, तो खूप मेहनती आहे. त्याला सर्वश्रेष्ठ बनायचं आहे.