हरभजन-रायडूच्या वादावर रोहितचे विधान
रायजिंग पुणे सुपरजायंटस वि मुंबई इंडियन्सच्या सामन्यादरम्यान हरभजन सिंग आणि अंबाती रायडू यांच्यातील वादाप्रकरणी कर्णधार रोहित शर्माचे विधान समोर आलेय.
मुंबई : रायजिंग पुणे सुपरजायंटस वि मुंबई इंडियन्सच्या सामन्यादरम्यान हरभजन सिंग आणि अंबाती रायडू यांच्यातील वादाप्रकरणी कर्णधार रोहित शर्माचे विधान समोर आलेय.
जेव्हा रोहितला यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा असं काही झालं नव्हतं. भज्जीला वाटतं होत की रायडूने थोडं स्क्वेअरमध्ये उभं राहाव आणि हेच तो रायडूला समजावण्यासाठी गेला होता. याव्यतिरिक्त काही नाही असं रोहितने सांगितलं.
हरभजन सिंग क्रिकेटमधील मोठं नाव आहे मात्र मैदानावरील गैरवर्तणुकीप्रकरणी अनेकदा तो चर्चेत राहिलाय. रविवारी मुंबई आणि पुणे यांच्यातील सामन्यादरम्यान हरभजनने रायडूला शिवी दिली. रायडूच्या मिसफिल्डिंगमुळे हरभजन रायडूवर चिडला होता.
त्यानंतर हरभजनला आपली चूक लक्षात आली आणि त्याने रायडूशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र रायडूने भज्जीशी बोलण्यात कोणताही रस दाखवला नाही.
अशाप्रकारे वर्तणूक करण्याची हरभजनची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अशा प्रकरणांमुळे हरभजनचे नाव चर्चेत होते.