रिटायरमेंटनंतरही सचिनचे विश्वविक्रम सुरुच
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले जवळपास सगळेच रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत.
मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले जवळपास सगळेच रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. पण रिटायर झाल्यानंतरही सचिन अजूनही नवनवे रेकॉर्ड बनवतच आहे.
सचिनचं आत्मचरित्र 'प्लेयिंग इट माय वे'ची नोंद लिमका बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. फिक्शन आणि नॉन फिक्शन प्रकारामध्ये सचिनच्या या आत्मचरित्राचा खप सगळ्यात जास्त आहे. सचिनच्या या आत्मचरित्राचं प्रकाशन 6 नोव्हेंबर 2014 ला झालं होतं.