मुंबई : बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं ऑस्ट्रेलियन ओपन सीरिज जिंकून भारताचं नाव रोशन केलं. या विजयानंतर सायनावर मोठ्या प्रमाणावर कौतुकाचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भारतीय टेस्ट क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं सायनाला या विजयाचा शुभेच्छा दिल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायनानंही या शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांना धन्यवाद दिले पण सायनानं विराट कोहलीला वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे. मला पुढच्या काळातही मॅच जिंकण्यासाठी तुझ्यासारखी आक्रमकता शिकायची गरज आहे, असं सायना म्हणाली आहे. ही आक्रमकता शिकायचा मी प्रयत्न करत आहे, असंही सायना म्हणाली आहे.