कोलकाता : वर्ल्डकप टी20 चा किताब आपल्या नावे करणाऱ्या वेस्टइंडिजचा हिरो मार्लन सॅमुअल्सवर ईडन गार्डन्समध्ये झालेल्या इंग्लंड विरोधातील सामन्यात चौथ्या विकेट दरम्यान आपत्तीजनक भाषा वापरल्याने मॅच फीसच्या 30 टक्के दंड लावण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅमुअल्सवर आयसीसीच्या आचार संहिता नियम २.१.४ नुसार कारवाई करण्यात आली आहे. अश्लिल, आक्रमक आणि अपमानजनक भाषेचा वापर केल्यास या नियमानुसार कारवाई केली जाते.


मॅचच्या शेवटच्या क्षणी सॅमुअल्सने बेन स्टोक्सबाबत अपमानजनक आणि आक्रामक भाषेचा वापर केला होता. सॅमुअल्सने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. अंपायर रंजन मदुगलेद्वारे करण्यात आलेला दंड त्याने स्विकार केला आहे. त्यामुळे याची कोणतीही अधिकारीक घोषणा करण्यात आली नाही.