मुंबई : टीम इंडियाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि रिद्धीमान साहाचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे, दुखातीमुळे ते  टीमच्या बाहेर होते, तर पार्थिव पटेलला वगळण्यात आले आहे. बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीह. हैद्राबादमध्ये  हा कसोटी सामना९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येईल.


बांगलादेश विरूद्धच्या कसोटीसाठी टीम इंडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, रिद्धीमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, इशांत शर्मा अभिनव मुकुंद आणि हार्दिक पंड्या


जयंत यादव आणि सलामीवीर मुरली विजय दुखापतीतून सावरले असून त्यांचाही संघात समावेश केला आहे.  पार्थिव पटेलने कसोटी क्रिकेटमध्ये ८  वर्षांनी पुनरागमन करत इंग्लंडविरुद्ध शानदार प्रदर्शन केलं होतं. मात्र यावेळी त्याच्याऐवजी रिद्धीमान साहाची निवड करण्यात आली आहे. तर अभिनव मुकुंद याचंही पुनरागमन झालं आहे.