पुणे : टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थान काबीज करणारी टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात अपयशी ठरली. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारतीय क्रिकेटर सपशेल नापास ठरले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेळपट्टी गोलंदाजीला पोषक असल्याने श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. पहिल्या काही षटकांतच टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसले. पहिल्या षटकांतील दुसऱ्या चेंडूत रोहित शर्मा तर शेवटच्या चेंडूवर अजिंक्य रहाणे हे दोन भरवशाचे फलंदाज बाद झाले. 


या धक्क्यातून टीम इंडिया सावरलीच नाही. यासोबतच टी-२० मध्ये पहिल्याच षटकांत दोन गडी गमावण्याची भारताची ही पहिलीच वेळ. याआधी २००८-०९मध्ये टी-२० सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भारताने ७ चेंडूत दोन गडी गमावले होते.