कोलकाता : टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचे आव्हान जरी सेमीफायनलमध्ये संपुष्टात आले असले तरी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मात्र मालिकावीराचा पुरस्कार जिंकलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या विराटने पाच सामन्यांत १३६.५० च्या सरासरीने २७३ धावा केल्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने भारताला पाकिस्तान तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. 


पुरस्कार सोहळ्याप्रसंगी विराट उपस्थित नसल्याने त्याच्या वतीने भारताचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुलीने पुरस्कार घेतला. विराटची वर्ल्डकपमधील ८९ धावांची सर्वोत्कृष्ट खेळी होती.