Monsoon Trips : कधी नावही ऐकलं नसेल अशा धबधब्यांची यादी; इथं येऊन परतीची वाट विसराल

Monsoon Trips : मान्सूननं जोरदार हजेरी लावत संपूर्ण महाराष्ट्राला ओलचिंब केलं आहे. अशा या मान्सूनचं अनोख रुप पाहायचंय? तर काही ऑफबिट ठिकाणांना नक्की भेट द्या...

Jun 11, 2024, 13:36 PM IST

Monsoon Trips : मान्सूनला सुरुवात झालीय, आणि नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. तुम्हीही या पावसाता भटकंतीसाठी नवी ठिकाणं शोधताय? ही ध्या Offbeat धबधब्यांची यादी 

1/7

कोंडाणा लेणी

Maharashtra best Waterfalls to visit during monsoon travel updates

Monsoon Trips : कोंडाणा लेणी  लोणावळ्यापासून 33 आणि कार्ल्यापासून 16 किमी अंतरावर असणाऱ्या कोंडाणा लेणी हा लेण्यांचा समुह पावसातून कमाल सुरेख दिसतो. इसवीसन पूर्व पहिल्या शतकात या लेण्या कोरल्या होत्या असं सांगितलं जातं. पावसानं जोर धरताच इथं हिरवळ दाटून येते आणि चहुबाजूंनी पाण्याचे प्रवाह धबधब्याच्या रुपात वाहू लागतात.   

2/7

भाजा धबधबा

Maharashtra best Waterfalls to visit during monsoon travel updates

मुंबई किंवा पुण्याहून ट्रेन पकडून भाजा लेणी इथं तुम्ही पोहोचू शकता. लोणावळ्याहूनही तुम्ही इथं मळवली लोकलनं पोहोचू शकता. मळवलीहून साधारण 3 किमी अंतरावर असणाऱ्या या लेणी आणि धबधब्यापर्यंत रस्ते मार्गानंही पोहोचता येतं.   

3/7

मढे घाट

Maharashtra best Waterfalls to visit during monsoon travel updates

पुण्याच्या दक्षिण पश्चिमेला असणारा हा धबधबा म्हणजे निसर्गाचा अविष्कार. राजगड, रायगड, भाटघर धरण आणि तोरणा किल्ल्याच्या मागील बाजूला मढे घाट धबधबा आहे. लक्ष्मी धबधबा अशी याची दुसरी ओळख.   

4/7

रंधा धबधबा

Maharashtra best Waterfalls to visit during monsoon travel updates

अहमदनगर जिल्ह्यातील राजूर – भंडारदरा मार्गावरच रंधा धबधबा आहे. भंडारदरा बस स्थानकापासून 10 किमी, पुण्यापासून 156 किमी आणि मुंबईपासून 177 किमी अंतरावर असणारा हा धबधबा प्रवरा नदीवर तयार झाला आहे.   

5/7

बेंदेवाडी धबधबा

Maharashtra best Waterfalls to visit during monsoon travel updates

पुण्याच्या नजीकच असणारं बेंदेवाडी धबधबा हे पावसाळी भटकंतीसाठीचं आणखी एक कमाल ठिकाण. पुण्यापासून 60 किमी अंतरावर  असणाऱ्या या ठिकाणी एका दिवसात सहज जाऊन परतता येतं.   

6/7

कुंडमळा धबधबा

Maharashtra best Waterfalls to visit during monsoon travel updates

पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा हे ठिकाण अनेकांच्या आवडीचं. निसर्गसौंदर्य आणि इथं असणाऱ्या शांततेसाठी पर्यटक कायमच या ठिकाणाला पसंती देतात.   

7/7

आदराई ट्रेक आणि धबधबा

Maharashtra best Waterfalls to visit during monsoon travel updates

जुन्नरहू नजवळ असणारा अदराई ट्रेक आणि इथं असणारा धबधबा तुम्हाला वेगळी अनुभूती देऊन जातो. इथं असणारा 1200 फुटी धबधबा आकर्षणाचं मुख्य केंद्र.