'तो माझ्या Love Interest ची भूमिका साकारणार असेल तर मी नक्की..'; सानिया मिर्झाच्या विधानाची चर्चा

Sania Mirza On Biopic And Her Love Interest Role: याच वर्षी अंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती घेतलेल्या सानियाचा काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकबरोबर घटस्फोट झाला आहे. असं असतानाच आता सानियाने तिच्या लव्ह इन्ट्रेस्टच्या भूमिकेसंदर्भात सूचक विधान केलं आहे. सध्या सानियाचं हे विधान चर्चेत आहे.

| Jun 11, 2024, 14:52 PM IST
1/12

Sania Mirza Love Interest Role

टेनिसच्या डबल्स म्हणजेच दुहेरी प्रकारामधील जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये भारताच्या सानिया मिर्झाचा समावेश होतो. अगदी जानेवारी 2023 मध्ये अंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्त होईपर्यंत सानिया अव्वल खेळाडूंपैकी एक होती.   

2/12

Sania Mirza Love Interest Role

मात्र आता सानियाला तिच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा आहे. मात्र यासाठी तिने एक अट ठेवली आहे. थेट एका अभिनेत्याचं नाव घेत सानियाने तो माझ्या प्रियकराची भूमिका साकारणार असेल तरच मी अभिनय करेन असं म्हटलं आहे.  

3/12

Sania Mirza Love Interest Role

सानियाने 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हसत हसत हे विधान केलं आहे. सानिया सहभागी झालेला हा भाग नेटफिक्सवरील या सिरीजमध्ये 8 जून रोजी प्रदर्शित झाला आहे.   

4/12

Sania Mirza Love Interest Role

'द ग्रेट इंडियन कपिल शो'ने ओटीटीवर आल्यानंतर पहिल्या पर्वात केवळ बॉलिवूड किंवा मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींपर्यंत मर्यादित न राहता खेळ आणि इतर क्षेत्रातील सेलिब्रिटींचाही समावेश केला आहे. श्रेयस अय्यर, रोहित शर्मा यासारख्या बड्या क्रिकेटपटूंबरोबरच एडी शेरीन सारख्या परदेशी गायकांचाही या शोमध्ये समावेश होता.

5/12

Sania Mirza Love Interest Role

आमिर खान, दिलजीत दोसांज यासारख्या हटके सेलिब्रिटी यंदा कपिल शर्माच्या शोमध्ये सहभागी झाले होते. मात्र नव्या भागात खऱ्या आयुष्यात जिच्याकडून टेनिसबरोबरच यशस्वी होण्याची प्रेरणा प्रत्येक महिलेला घेता येईल अशा सानियासहीत महिला खेळाडूंना आमंत्रित करण्यात आलं होतं.  

6/12

Sania Mirza Love Interest Role

सानियाबरोबरच या भागात मेरी कोम, सानिया नेहवाल आणि पॅरीस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल शुटींगमधील नेमबाद सिफ्त कौर सामरा सहभागी झाल्या होत्या.   

7/12

Sania Mirza Love Interest Role

या शोमध्ये कपिल शर्माने प्रियंका चोप्राने मेरी कोमची भूमिका साकारल्याचा संदर्भ दिला. तसेच परिणिती चोप्राने सायना नेहवालची भूमिका एका बायोपिकमध्ये साकारली होती, असं सांगत सानियाला तुझ्या आयुष्यावर चित्रपट आल्यास तुझी भूमिका कोणी साकारावी? असा प्रश्न कपिलने विचारला.

8/12

Sania Mirza Love Interest Role

"अजून कोणी चोप्रा बहीण शिल्लक आहे का जी ही भूमिका साकारु शकते?" असा खोचक प्रश्न सानियाने विचारला. तिचा प्रश्न ऐकून सारेच हसू लागले.

9/12

Sania Mirza Love Interest Role

तसेच पुढे बोलताना सानियाने चित्रपटामध्ये तिच्या प्रियकराची भूमिका कोणी साकारावी याबद्दल बोलताना आधी मला खऱ्या आयुष्यात प्रियकर शोधावा लागेल असं म्हटलं. 

10/12

Sania Mirza Love Interest Role

सानिया आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा याच वर्षी घटस्फोट झाला आहे. त्यामुळेच तिने नवा लव्ह पार्टनर शोधण्यासंदर्भात सूचक विधान केलं.

11/12

Sania Mirza Love Interest Role

सानिया आणि शोएब या दोघांना एक पाच वर्षांचा मुलगा आहे. त्यांचाघटस्फोट झाल्यानंतर त्यांचा मुलगा सानियाबरोबरच राहतो.

12/12

Sania Mirza Love Interest Role

कपिलने प्रश्न बदलून शाहरुख खान तुझ्या लव्ह इन्ट्रेस्टची म्हणजेच प्रियकराची भूमिका साकारणार असेल तर तू चित्रपटात काम करशील का? असं सानियाला विचारला. त्यावर तिने नक्कीच असं उत्तर दिलं. 'पण ही लव्ह इन्स्ट्रेस्टची भूमिका अक्षय कुमार साकारणार असेल तर मी नक्कीच या चित्रपटात अभिनय करेन', असं सानिया म्हणाली. सानिया ही अक्षय कुमारची फार मोठी चाहती आहे.