पुणे : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या समोर शून्य ही धावसंख्या फार क्वचितच पाहायला मिळते. गेल्या काही मालिकांमधील विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म पाहता शून्य हा अंक त्याच्या नावासमोर पाहायलाही मिळालेला नाहीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र पुण्याच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराटच्या कामगिरीने समस्त भारतीय चाहत्यांची घोर निराशा झाली. 


गेल्या काही सामन्यांतील जबरदस्त फॉर्म या मालिकेतही विराट कायम राखेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात मिचेल स्टार्कच्या चेंडूने विराटचा घात केला आणि तो शून्यावर बाद झाला. 


दोन वर्षाहून अधिक काळानंतर तो शून्यावर बाद झालाय. याआधी ७ ऑगस्ट २०१४मध्ये मँचेस्टर कसोटीतील पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर तब्बल १०४ कसोटीतील डावांनंतर त्याच्यावर शून्यावर बाद होण्याची वेळ आली.