श्रीनगर : टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात भारताने एका धावेने विजय मिळवला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटच्या तीन चेंडूत बांगलादेशला दोन धावा हव्या होत्या. मात्र त्यांनी त्या तीन चेंडूत तीन गडी गमावले. हा पराभव बांगलादेशच्या चांगलाच जिव्हारी लागला. या पराभवानंतर बांगलादेशचा कर्णधार मुश्रफे मोर्तझा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रात्रीचे जेवणही घेतले नाही. 


आम्ही पराभवामुळे खूप निराश होतो. हरणे हा खेळाचा हिस्सा आहे मात्र आम्हाला तो सामना हरायचा नव्हता. त्या रात्री कोणीही जेवले नाही, असे मोर्तझाने सांगितले. बांगलादेशचा कर्णधार मोर्तझा सोमवारी श्रीनगरमधील सोनमर्ग रोडवरील एका गावात थांबला होता.