पुणे :  भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवार खेळविण्यात आलेल्या पहिलया वन डे सामन्यात ६५ चेंडूत शतक झळकविणाऱ्या केदार जाधवच्या पत्नीला त्याची ही शानदार खेळी पाहता आली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३५१ धावांचा पाठलाग करताना केदार जाधव याने १२० धावांची शानदार खेळी करत मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपल्या नावावर केला. पण यावेळी स्टेडिअममध्ये आपल्या राहता आले नाही याचे दुःख केदारची पत्नी स्नेहलला  आयुष्यभर राहणार आहे.  


इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार स्नेहल आपल्या सासू-सासऱ्यांसह गहूंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडिअमवर आली होती. पण त्याचं मूल रडू लागले आणि ते थांबतच नव्हते. त्यामुळे तिला स्टेडिअममधून घरी जावे लागले. त्यामुळे तिला स्टेडिअममध्ये बसून शतक पाहता आले नाही. 
 
केदारने लिलया चौकार लगावून आपले शतक झळकावले. तेव्हा त्याचे आई-वडील स्टेडिअममध्ये उपस्थित होते. त्यांनी केदारच्या या कामगिरीबद्दल उठून टाळ्या वाजविल्या. शतक लगावण्यापूर्वी केदारच्या शरिरात क्रॅप्स येत होते. पण असे असूनही त्याने जबरदस्त खेळी करत ७६ चेंडूत १२० धावा बनवून तो बाद झाला. त्याची हालत पाहू त्याची आई चिंतित दिसत होती. 


जाधव आणि कोहलीने पाचव्या विकेटसाठी २०० धावांची भागिदारी केली. भारताकडून हे दुसऱ्यांदा आहे की भारताकडून पाचव्या विकेटसाठी २०० धावांची भागिदारी झाली. तसेच जाधव आणि कोहलीच्या जोडीने एमएस धोनी आणि रैना यांचे रेकॉर्ड तोडले. धोनी रैनाने २०१५मध्ये झिम्बाव्बे विरूद्ध ऑकलंडमध्ये पाचव्या विकेटसाठी १९६ धावांची भागिदारी केली होती.