मुंबई : ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावणं हे जगभरातील खेळाडूंचं स्वप्न असतं. पोडीयमवर उभं राहून मेडल स्वीकारण्याचा ऐतिहासिक क्षण का केवळ त्या एकट्या खेळाडूचा नसतो तर तो त्याच्या देशाचाही असतो. प्रचंड मेहनतीनं पटकावलेलं हे मेडल चावून प्रत्येक खेळाडू हा सुवर्णक्षण साजरा करतो आणि त्याच्या देशवासियांसाठीही त्यांच्या खेळाडूंचा मेडल चावतानाचा तो क्षण ऐतिहासिक असतो. पाहूयात खेळाडू मेडलचा चावा नक्की का घेतात ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेळाडूंचे मेडलचा चावा घेतांनाचा फोटो पाहिल्यावर आपल्या मनात अनेक भावना उंचबळून येतात. जिंकण्याची जिद्द, विजयाचा जल्लोष, संघर्ष, ऐतिहासिक कामगिरी, विक्रम, देशाचा अभिमान असे विचार किंवा भावना आपल्या मनात डोकावतात. जवळपास प्रत्येक खेळाडू मेडल स्वीकारल्यानंतर ते मेडल चावून आपला आनंद व्यक्त करताना दिसतो. आता आपल्याला प्रश्न पडला असेल मेडलं असं चावून आनंद का व्यक्त केला जातो. यामागे एक कारण असं आहे की फोटोग्राफर्सच्या विनंतीवरुनच अशाप्रकारे विजयी खेळाडूंनी पोझ देण्यास सुरुवात झाली. ही विजयानंतरची पोझ किंवा पोझ सर्वोत्तम असतो आणि या फोटोतून त्या-त्या देशाचा अभिमान झळकत असतो. 


याखेरीज असंही म्हटलं जातं की फार पूर्वीपासून सोन्याच खरेपणा पडताळून पाहण्यासाठी ते दातानं चावण्याची पद्धत आहे. शुद्ध सोनं अतिशय नरम असतं. ते चावलं तर त्याच्यावर दाताच्या खुणा सहज उमटतात. आपल्याला मिळालेलं मेडलं किती खरं आहे हे पाहण्यासाठी ते दातानं चावण्याची पद्धत पडली असावी आणि आता ती रुळलीही आहे. 


वास्तविक आता देण्यात येणारी मेडल्स ही शुद्ध सोन्याची नसतात. 1912पासून या मेडल्समध्ये 6 ग्रॅम सोन्याचा मुलामा चढविण्याची पद्धत रुढ जाली. सध्याचे ऑलिम्पिक मेडल हे स्टर्लिंग चांदीचं असतं. आणि त्यावर सोन्याचा मुलामा दिलेला असतो. चांदीही दातांसाठी नरम असते. त्यामुळे खेळाडूंना आपल्याला मिळालेलं मेडल शुद्ध सोन्याचं नाही याची पूर्ण कल्पना असते तरीही ते चावून पाहतात. मेडल चावण्यामागे कोणतीही कहाणी असो मात्र तो फोटो किंवा पोझ हा त्या खेळाडूसाठी आणि त्याच्या देशासाठी नक्कीच अभिमानाचा क्षण असतो.