कोलकाता : इंग्लंडविरुद्ध वनडे सीरिज सुरु होण्याच्या एक दिवसआधी पुण्यात कर्णधार विराट कोहलीने विजयाचा निर्धार केला होता. त्यावेळी हे सामन्यांकडे केवळ आपण केवळ ट्रायल म्हणून पाहत नाही आहोत असेही म्हटले होते. कोहलीच्या मते हे सामने म्हणजे इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीची रंगीत तालीम असेल आणि प्रत्येक सामना नॉकआउट सामन्याप्रमाणेच असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटने बोललेले करुन दाखवले. पुण्यात पहिल्या वनडेत शानदार विजय मिळवला त्यानंतर कटकमध्येही इंग्लंडला धूळ चारली. आता आजच्या तिसऱ्या सामन्यातही इंग्लंडला पराभवाचा धक्का देत सीरिजमध्ये ३-० असा विजय मिळवण्याचा कोहली आणि टीमचा निर्धार आहे. 


इंग्लंडविरुद्धची सीरिज भारताने जिंकली असली तरी कोहलीला काही गोष्टींची मात्र चिंता आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या दृष्टिकोनातून टीम इंडियाचा सराव चांगला सुरु आहे का? युवराजचे पुनरागमन, महेंद्रसिंग धोनीचा फॉर्म, केदार जाधवचा झंझावात. विराटने दोन सामन्यांत बरेच काही मिळवलेय. मात्र अशाही काही गोष्टी आहेत ज्याची चिंता त्याला सतावतेय.


पुणे आणि कटक येथे झालेल्या दोन्ही सामन्यांचा धावांचा पाऊस पाहायला मिळाला. दोन्ही वनडेत भारतीय संघाने एकूण ७१६ धावा लुटल्या. आतापर्यंत जसप्रीत बुमराहने दोन सामन्यात १६० धावा, आर. अश्विनने १२८, भुवनेश्वरने एका सामन्यात ६३ धावा, रविंद्र जडेजाने २ सामन्यांत ९५ धावा, उमेश यादवने एका सामन्यात ६३ धावा लुटल्या. याचमुळे कोहलीची चिंता वाढलीये. 


इतक्या धावा करुनही भारताने दोन्ही सामन्यांत विजय मिळवला तो फलंदाजांच्या जोरावर. मात्र दरवेळी असे होईलच असे नाही. केवळ विजयासाठी फलंदाजांवर अवलंबून राहणे शक्य नाही. इंग्लंडमधील वातावरण, खेळपट्टी सर्व काही वेगळे असेल. अशा परिस्थितीत भारताच्या गोलंदाजी चांगली झाली नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केवळ फलंदाजच दरवेळी मॅचविनर ठरतील असे नाही. 


त्यासोबतच शिखर धवन फॉर्ममध्ये नाहीये. त्याने दोन सामन्यांत केवळ १२ धावा केल्या. त्यामुळे आजच्या सामन्यात अजिंक्य रहाणेला संधी मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.