शतकानंतर का रडला होता, स्वतः सांगितलं युवीने...
भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगने तब्बल पाच वर्षांनंतर म्हणजे २०११ च्या वर्ल्ड कपनंतर पहिली सेंच्युरी लगावली. दीर्घकाळानंतर आपला फॉर्म गवसला त्यामुळे युवराज सिंग अत्यंत भावुक झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. पण तो का भावूक झाला याचं उत्तर स्वतः युवराजने सांगितले आहे.
कटक : भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगने तब्बल पाच वर्षांनंतर म्हणजे २०११ च्या वर्ल्ड कपनंतर पहिली सेंच्युरी लगावली. दीर्घकाळानंतर आपला फॉर्म गवसला त्यामुळे युवराज सिंग अत्यंत भावुक झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. पण तो का भावूक झाला याचं उत्तर स्वतः युवराजने सांगितले आहे.
मॅचनंतर स्टार स्पोर्ट्सच्या टीमशी बोलताना युवी म्हणाला, जेव्हा मी शतक पूर्ण केलं तेव्हा तो क्षण माझ्यासाठी खूप भावनिक होता. मी ज्या आजारातून बाहेर पडलो, त्यानंतर भारतासाठी पुन्हा खेळू शकेल का याचाही विचार करू शकत नव्हतो. पण त्यातून बाहेर पडत मी आज शतक ठोकले, माझ्या आयुष्यात काय मी भोगले हे मलाच ठाऊक असे म्हणून त्याने अनेक प्रश्न उपस्थित केले.