बंगळुरू : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20मध्ये भारतानं इंग्लंडला तब्बल 75 रननी धूळ चारली. या मॅचमध्ये सहा विकेट घेणारा युझुवेंद्र चहालनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असलं तरी युवराजनं मात्र जुन्या आठवणी जागवल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अठराव्या ओव्हरमध्ये युवराज सिंगनं क्रिस जॉर्डनला तीन उत्तूंग सिक्स मारल्या. 10 बॉलमध्ये युवराजनं 27 रनची खेळी केली, यामध्ये तीन सिक्स आणि एक फोरचा समावेश होता. 2007च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला युवराजनं सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारण्याचा विक्रम केला होता. या आठवणी बंगळुरूच्या मॅचवेळी पुन्हा जाग्या झाल्या. 


पाहा युवराजची तुफान फटकेबाजी