कटक : भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याचे नुकतेच लग्न झाले, लग्नानंतर ही त्याची पहिली सिरीज आहे, तसेच त्याने लग्नानंतर पहिलेच शतक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅच संपल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यात सामनावीराचा किताब पटकाविणाऱ्या युवराज सिंगला क्रिकेट समालोचक रवी शास्त्री यांनी लेडी लकबद्दल प्रश्न विचारला. लग्नानंतर ही पहिलीच सिरीज होती. त्यात तू शतक ठोकले. यात लेडी लक आहे का... त्यावर युवी म्हणाला, यात लेडी लक आहे. त्याबरोबर माझ्या आई आणि गुरूंचे आशीर्वाद आहे. त्यामुळेच मी चांगली कामगिरी करू शकलो. 


का झाला होता भावूक


मॅचनंतर स्टार स्पोर्ट्सच्या टीमशी बोलताना युवी म्हणाला, जेव्हा मी शतक पूर्ण केलं तेव्हा तो क्षण माझ्यासाठी खूप भावनिक होता. मी ज्या आजारातून बाहेर पडलो, त्यानंतर भारतासाठी पुन्हा खेळू शकेल का याचाही विचार करू शकत नव्हतो. पण त्यातून बाहेर पडत मी आज शतक ठोकले, माझ्या आयुष्यात काय मी भोगले हे मलाच ठाऊक असे म्हणून त्याने अनेक प्रश्न उपस्थित केले.