मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या जेवणानंतर ऑफिसमध्ये सुस्ती येते, कामाचा व्याप हा खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये सारखाच असतो. तेव्हा ही सुस्ती टाळणे अतिशय महत्वाचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑफिसमधील सुस्ती टाळण्यासाठी दुपारचे जेवण कमी करा. म्हणजेच प्रमाणापेक्षा जास्त आहार नको, जरा जास्त पाणी प्या, पाणी पिल्याने शरीरातील स्फुर्ती कायम राहते.


कामाच्या जागेवर सतत न बसता जरा दोन मिनिटे फिरून या, चहाचा आस्वाद घेतल्यास आणखी उत्तम, यामुळे तुमची सुस्ती आणि झोपेची गुंगी निघून जाईल आणि कामात मन लागेल.


ऑफिसमध्ये दुपारच्या वेळेत सतत झोप येत असल्याचं, तुमच्या झोपेची वेळ ठरवा आणि दिवसा येणाऱ्या डुलक्या टाळा, यामुळे तुमच्या ऑफिसमधील दिवस चांगला जाणार आहे.