COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : लालबागच्या गणेश टॉकीजजवळ जयंत भेलपुरी सेंटर आहे, येथे तुम्ही पाणीपुरी मागितली, तर तुम्हाला एक-एक करून मिळत नाही, तर पाणी आणि गोड तिखट पाण्यासह अख्ख ताटंच तुमच्यासमोर ठेवलं जातं यामुळे, तिखट, गो़ड, की मीडियम असं सांगायची गरज तुम्हाला पडणार नाही, ते तुम्हीच कमी जास्त करून खाऊ शकतात, अगदी आरामात.

येथील मिसळ पाव, आणि रगडा पावही प्रचंड प्रसिद्ध आहे, भाव तव्यावर चांगला भाजल्यानंतरच दिला जातो, एवढंच नाही उन्हाळ्याचे दिवस असतील तर इथलं ताकही चाखा आणि मिसळ आणि रगडा खाताना तिखट हवं असेल तर तिखट पाणी छोट्या वाटीत मागून घ्या आणि जिभेचे लाड पुरवा. हे शॉप कसं आहे हे या व्हिडीओत पाहा...