मुलाखतीला जाताना या ४ गोष्टी लक्षात ठेवा
`इंटरव्हू हि जॉब मिळवण्याची पहिली पायरी आहे` असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी काही महत्वपूर्ण बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्यापैकी बऱ्याच स्त्रीया आता करिअरच्या दृष्टीने जास्त गांभीर्यतेने विचार करत आहेत. त्यातली पहिली पायरी म्हणजे `मुलाखत`. त्यासाठीची तयारी करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा :
मुंबई : 'इंटरव्हू हि जॉब मिळवण्याची पहिली पायरी आहे' असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी काही महत्वपूर्ण बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्यापैकी बऱ्याच स्त्रीया आता करिअरच्या दृष्टीने जास्त गांभीर्यतेने विचार करत आहेत. त्यातली पहिली पायरी म्हणजे 'मुलाखत'. त्यासाठीची तयारी करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा :
१. मुलाखतीला जाण्यापूर्वी :
आपण ज्या कंपनीमध्ये मुलाखत देणार आहोत त्या कंपनीची संपूर्ण माहिती नीट वाचून घ्या. तुमच्या कामाचे स्वरूप आणि त्यातून तुमची पगाराची अपेक्षा याबाबत निश्चिती करा. तसेच बायोडेटा तयार करताना त्यात तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, आधीच्या कामाचा अनुभव इत्यादींबाबत सविस्तर माहिती नमूद करा.
२. पेहराव :
मुलाखतीला जाताना पेहराव हा महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे गढद रंगाचे कपडे घालू नका. ट्राउजर - शर्ट, इंडियन फ़ॉर्मलमध्ये पंजाबी ड्रेस किंवा साडी देखील चालू शकते; फक्त आपण त्यात comfortable आहोत ना याची खात्री करून घ्या. मेकअप देखील जास्त भडक असू नये. केस नीट बांधून घेणे आवश्यक आहेत जेणेकरून ते डोळ्यावर येणार नाही.
३. व्यक्त होताना :
आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अगदी स्पष्टपणे द्या. तुम्हाला येत असलेल्या गोष्टींचे सादारीकरण आत्मविश्वासाने द्या; पण त्याच बरोबर तुमच्या मर्यादा देखील सांगायची तयारी ठेवा जेणेकरून जॉईन होण्याआधी तुमच्याबद्दल स्पष्टता राहील. याबरोबरच नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता दाखवा आणि तशी तयारी असू द्यावी.
४. कोणतीही संधी शेवटची नसते :
मुलाखतीला जाताना आत्मविश्वास असावा पण आपल्याला ती नोकरी मिळेलच अशी अपेक्षा नको. जर तुमची निवड झाली नाही तर त्यातून पदरी निराशा पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणतीही संधी शेवटची नसते हे लक्षात ठेवा आणि त्याच मानसिकतेने मुलाखतीला सामोरे जा.