मुंबई : महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाण्याऱ्यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये चढण्याच्या दृष्टीनं असे अनेक किल्ले धोकायदायक आहेत. यातलाच एक किल्ला म्हणजे प्रबळगड. पनवेलजवळ असलेला हा किल्ला तब्बल 2300 फूट उंच आहे. प्रबळगड हा भारतातला सगळ्यात खतरनाक किल्ला मानला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या किल्ल्यावर जायचा रस्ता प्रचंड धोकादायक आहे. जायला छोटा रस्ता आणि बाजूला खोल दरी यामुळे हा किल्ला सर करताना एक चूक तुमचा जीव घालवू शकते. हा किल्ला चढताना काही ठिकाणी शिड्या आहेत, पण त्या हातानी पकडायला रेलिंगही नाही. हा किल्ला सर करताना अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. 



या किल्ल्याचं आधीचं नाव मुरंजन होतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे नाव बदलून कलावंतीण दूर्ग असं ठेवलं. पाहा या किल्ल्याचा खास व्हिडिओ