मुंबई : Myntra कडे आता jabong ची मालकी असणार आहे, ४ अब्ज ७० कोटी रूपयांना मिंत्राने जबाँगला खरेदी केलं आहे. Myntra फ्लिपकार्टची फॅशन रिटेल वेबसाइट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी jabongला खरेदी करण्यासाठी फ्यूचर ग्रुप, स्नॅपडील, आदित्य बिर्लाच्या Abof कंपनीसह अनेक कंपन्यांसोबत बातचीत सुरु होती.


jabong जवळ १५०० पेक्षा जास्त रिटेल ब्रांण्ड आहेत. मागील वर्षी jabong ला बरंच नुकसान सोसावं लागलं होतं.


अमेझॉन, स्नॅपडील याशिवाय अनेक छोट्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटला Myntraचा सामना करावा लागणार आहे. या डीलनंतर फ्लिपकार्टनंतर Myntra ही देशातील सगळ्यात मोटी ऑनलाइन फॅशन कंपनी झाली आहे.