मुंबई : मोबाईल फोन नोकिया 3310 पुन्हा एकदा बाजारात आला आहे. भारतात हा फोन लॉन्च होत आहे. काही वर्षांपूर्वी नोकियाने 3310 हे मॉडेल बंद केले होते. पुन्हा एकता हे मॉडेल लॉन्च केले आहे. नोकिया बॅंडचे लायन्सेंस वापरणारी एचएमडी ग्लोबलने हा फोन भारतात लॉन्च केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकिया 3310 या मोबाईलची विक्री भारतात 18 मेपासून होणार आहे. फिनलॅंडची मोबाईल कंपनी एचएमडी-ग्लोबलने नोकिया 3310 हॅण्डसेटची विक्री 18 मेपासून सुरु करणार आहे. या फोनची किंमत 3310 असेल. हा मोबाईल सर्व प्रमुख मोबाईल स्टोअर्समध्ये 18 मे 2017पासून उपलब्ध असेल.


नोकिया फोन का डिझाएन तयार करणारी आणि जगात विक्री करणाऱ्याचा परवाना एचएमडी ग्लोबलला देण्यात आलेला आहे. या फोनमध्ये दुहेरी सिम आहे. 2.5 जी फीचर फोन आहे. 1200 एमएएच बॅटरी क्षमता आहे. एकदा चार्ज केला की या फोनची बॅटरी 22 तास चालेल.


नोकिया सीरीज 30 + आहे. फोनचा डायमेंशन 115.6 X5.0X21.8 एमएम आहे. या फोनचे वजन 79.6 ग्राम आहे. फोनमध्ये 2.4 इंचाची कर्व्ह विंडो कलर क्यूव्हीजीए 240X320  पिक्सल रिजोल्यूशनचा डिस्प्ले आहे. एलईडी बॅटरी, ब्लूटूथ,  3.5 एमएमऑडिओ-व्हिडिओ कनेक्टर, मायक्रो यूएसबी यात उपलब्ध आहे.