मुंबई : फेसबुकवर सध्या एक मेसेज सध्या व्हायरल होतोय. या फेसबुक पोस्टमध्ये फेसबुक यूझर्सचे फोटोज, कंटेन्ट आणि प्रायव्हेट कंटेटला सार्वजनिक करण्यात आलंय असं म्हटलं गेलंय. खरंतर ही पोस्ट फेक आहे. यात कोणतेही तथ्य नाही. 


जाणून घ्या यामागचे सत्य 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचा वापर लोक विचार आणि त्यांची मते व्यक्त करण्यासाठी करतात. मात्र अनेकदा याचा गैरवापर होतो. गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर यूझर्सच्या कंटेट प्रायव्हसीवरुन एक मेसेज व्हायरल होतोय.


या मेसेजमध्ये फेसबुक आपल्या कंटेट प्रायव्हसीमध्ये बदल करत आहे.ज्यामुळे फेसबुक यूजर्सचे पोस्ट, कंटेट आणि प्रायव्हेट फोटोज सार्वजनिक होतील. यामुळे यूजर्सना अपील करण्यात आले आहे की या व्हायरल मेसेजला आपल्या टाईमलाईनवर कॉपी करुन पेस्ट करा. त्यानंतर हा मेसेज लोकांनी पोस्ट करण्यास सुरुवात केलीये. मात्र हा मेसेज खोटा आहे.