तुकाराम मुंढेंकडून ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर
सुविधा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीनं ई-गव्हर्नंसचा प्रभावी वापर करण्यावर, नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेष लक्ष दिलंय.
नवी मुंबई : महानगरपालिकेशी संबंधित सुविधा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीनं ई-गव्हर्नंसचा प्रभावी वापर करण्यावर, नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेष लक्ष दिलंय.
महापालिकेचं मोबाईल ऍप अद्ययावत केलं असून त्यात आधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्यायत. तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून "nmmc e-connect" हे विशेष मोबाईल अॅप विकसित करण्यात आलं आहे.
या अॅपव्दारे मालमत्ताकर, पाणीपट्टी भरणा करण्यासोबतच 'ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली' उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यापूर्वीच्या "nmmc citizen" या मोबाईल अॅपवर मालमत्ताकर आणि पाणीपट्टी भरणा करता येऊ शकत होता.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या कर भरणा प्रक्रियेत अधिक सुविधा देत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग अशा सुविधा अॅपव्दारे उपलब्ध करून दिल्या आहेत.
इंटरनेट बँकिंग सुविधेमध्ये ४० नामांकित बँकांचा समावेश आहे. कॅशलेस व्यवहाराच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने टाकलेले हे यशस्वी पाऊल आहे.