लखनौ : उत्‍तर प्रदेशातील दोन युवांनी इंजिनिअरिंग सोडून चहा विकण्याचा व्यवसाय केला आहे. सुरूवातीला त्यांनी १ लाख रूपये भांडवल टाकले होते, त्यांनी एका वर्षात ७० लाख रूपये कमावले आहेत. अभिनव टंडन आणि प्रमीत शर्मा यांनी हे घवघवीत यश मिळवले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाय कॉलिंग असा चहाचा ब्रॅण्ड त्यांनी तयार केला आहे. हे दोघेही चहाची होम डिलेवरी देतात.खासगी कार्यालयातून त्‍यांच्‍यासोबत अनेक ग्राहक जोडले गेले आहेत. आता शासकीय आणि निम शासकीय कार्यालयातही त्यांचे ग्राहक आहेत.


'चहा कॉलिंग' नावाने त्‍यांनी एका वर्षापूर्वी ९ टी-स्टॉल सुरू केले. त्‍यापैकी ६ बरेलीमध्‍ये तर ३ नोयडामध्‍ये आहेत.या सर्व स्टालच्या माध्‍यमातून त्‍यांनी  वर्षभरात ७० लाख रुपयांची कमाई केली. आता देशातील इतरही शहरात टी-स्‍लॉट सुरू करण्‍याची योजना त्यांनी आखली आहे.