मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन सौरव घोष त्याच्या एका व्हिडिओमुळे वादात अडकलाय.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या दोन विमानतळांच्या नावावरून उडालेला गोंधळ त्यानं या व्हिडिओत कथन केलाय. तसंच डोमेस्टिक विमानं 'इंटरनॅशनल' विमान तळावरून उड्डाण का करतात? असा साहजिकच कोणत्याही सामान्य माणसाला पडणारा प्रश्न त्यानं विचारलाय. 


परंतु, या दरम्यान विमानतळाला दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचाही उल्लेख त्यानं केलाय. या नावावरून उडवलेल्या खिल्लीवरून सोशल मीडियावर सौरववर बरीच टीकाही होतेय.  


एका शहरात दोन विमानतळं का? दोन्ही एअरपोर्टचं नाव छत्रपती शिवाजी का? मला स्वत:च्या घरी जाण्यासाठी T1, T2 अशी नवीन भाषा का शिकावी लागते? असे अनेक प्रश्न त्यानं महाराष्ट्र सरकारला विचारले आहेत.