मुंबई : सेकंड हँड मोबाईल स्वस्त असतात म्हणून आपल्यातील अनेक जण सेकंड हँड मोबाईल फोन खरेदी करण्यास पसंती देतात. पण, हा मोबाईल खरेदी करताना काही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्केट प्लेस 
अनेक जण ऑनलाईन वेबसाईट्सवरुन सेकंड हँड फोन खरेदी करण्यास पसंती देतात. या वेबसाईटवर फोन विकणाऱ्या व्यक्तीकडून फोन खरेदी करण्यापूर्वी त्या व्यक्तीला एकदा भेटा आणि तो फोन एकदा तपासून पाहा. 


फोनचे बिल घ्यायला विसरू नका
सेकंड हँड मोबाईल खरेदी करताना त्याच्या मूळ मालकाकडून त्या मोबाईल फोनचे बिल जरुर घ्या. या फोनमध्ये भविष्यात काही तांत्रिक खराबी आली तर हे बिल तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे. या बिलावर फोनचा आयएमईआय नंबर असतो जो तुमच्या कामी येऊ शकतो. 


२ जीबी रॅम 
आजकाल प्रत्येक मोबाईलमध्ये २ जीबीचा रॅम असतो. कमी किंमतीच्या मोबाईल फोन्समध्येही २ जीबी रॅम असतो. तुम्ही घेत असलेल्या फोनमध्येही तो असेल याची काळजी घ्या. 


 फोन चोरीचा तर नाही?
चोरी केलेले अनेक मोबाईल फोन्स आजकाल सर्रास काळ्या बाजारात विकले जातात. यातील काही माल तर चक्क ऑनलाईनही विकला जातो. तुम्ही घेत असलेल्या फोनच्या आयएमईआय क्रमांकाची पडताळणी करुन घ्या. तो फोन चोरीचा माल नाही ना, याची काळजी घ्या. नाहीतर तुम्ही अडचणीत येऊ शकता.