तुमचा अँड्रॉइड फोन दहा सेकंदात होऊ शकतो हॅक
मुंबई : तुम्ही जर अँड्रॉइड फोन वापरत असाल, तर सावधान!
मुंबई : तुम्ही जर अँड्रॉइड फोन वापरत असाल, तर सावधान! तुमचा फोन हॅक होण्याची शक्यता आहे. इस्राईलमधील एका सायबर सुरक्षा संस्थेने हा धोका वर्तवला आहे. अँड्रॉइडमध्ये असलेल्या एका तूटीचा फायदा घेऊन केवळ १० सेकंदांत तुमचा मोबाईल फोन हॅक केला जाऊ शकतो.
स्टेजफ्राइट नावाचा एक बग तुमच्या अँड्रॉइड डिव्हाईसमधील मीडिया प्रोसेसिंग सिस्टिमवर हल्ला करतो. त्यानंतर एमपी३ किंवा एमपी४ च्या माध्यमातून हॅकर्स तुमच्या मोबाईलचा कंट्रोल मिळवू शकतात. याचा सर्वात जास्त धोका अँड्रॉइड व्हर्जन २.२, ४.०, ५.० आणि ५.१ यांना आहे. जगभरातील १.४ अब्ज अँड्रॉइडपैकी सर्वाधिक जणांकडे २.० आणि ५.० बे व्हर्जन आहे.
कंपनीने जारी केलेल्या व्हिडिओनुसार हॅकर्स या व्यक्तीच्या मोबाईलवर एक लिंक पाठवतो. त्या लिंकवर क्लिक केल्यावर हा बग मोबाईलमध्ये येऊन मोबाईलच्या सिस्टिमवर हल्ला करतो. आणि या पूर्ण घटनेसाठी केवळ दोन सेकंदांचा कालावधी लागतो.
यानंतर गूगलने यावर स्पष्टोक्ती दिली आहे की १ ऑक्टोबर २०१५ ला एक अपडेट जारी केली होती. त्यात हा बग फिक्स करण्यात आला आहे.