Crime News : ...म्हणून सख्या भावानेच बहिणीच्या डोक्यात सिमेंटचा पेवर ब्लॉक घातला; सैराटपेक्षा डेंजर स्टोरी
शिर्डीत भावाने बहिणीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. 19 वर्षीय भावाने आपल्या 17 वर्षीय बहिणीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीसांनी आरोपीला गजाआड केले असून अधिक तपास केला जात आहे.
Shirdi Crime News : नागराज मंजुरे यांच्या 'सैराट' चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. यात सख्या भावानेच बहिणीची हत्या केली. सैराट चित्रपटापेक्षा डेंजर स्टोरी प्रत्यक्षात घडली आहे. सख्या भावानेच बहिणीच्या डोक्यात सिमेंटचा पेवर ब्लॉक घालून तिची हत्या केली आहे. शिर्डीमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे.
शिर्डीत भावाने बहिणीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. 19 वर्षीय भावाने आपल्या 17 वर्षीय बहिणीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीसांनी आरोपीला गजाआड केले असून अधिक तपास केला जात आहे.
शिर्डीतील मयुरेश्वर कॉलनात हे हत्याकांड घडले आहे. घरातच या निर्दयी भावाने आपल्या बहिणीचा जीव घेतला आहे. हत्या केल्यानंतर तो घटनास्थळवारुन फरार झाला होता. पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील येवला येथून त्याला अटक केली आहे. बहिणीचे एका तरुणासह प्रेमसंबध होते. यामुळेच भावाने बहिणीची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
क्षुल्लक कारणावरून मित्रानेच केली मित्राची हत्या
क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरातील सुभाषनर मध्ये मंगळवारी रात्री ही घटना घडली. 25 वर्षीय क्रांती उबाळे आणि आरोपी संचिन कांबळे हे दोघे मित्र दारूच्या नशेत होते. दोघांमध्ये काही क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. रागाच्या भरात सचिन कांबळे ने क्रांती उबाळे याच्या पोटात चाकूने वार केले. जखमी अवस्थेत क्रांती ला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा मृत्यू झाला. दरम्यान आरोपी सचिन कांबळे याला काही तासाच्या आत धर्माबाद पोलीसांनी अटक केली.
रेल्वे रुळावरील खांबाला गळफास घेतला
हिंगोली रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे रुळावरील विद्युतिकरणाच्या खांबाला लटकत एका तरुणाने स्वतःला गळफास लावून घेतल्याची घटना समोर आली आहे. विशाल धारणे अस या मृत तरुणाचे नाव आहे. तो औंढा नागनाथ तालुक्यातील ढवळगाव येथील रहिवासी आहे. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. नेमकी त्याने आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाही.