Sanjay Raut Slams Raj Thakcery Over Hindu Muslim Comment: महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. हिंदू-मुस्लिम मुद्दा उपस्थित करत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी मशिदींमधून फतवे काढले जात असल्याचा आरोप करत महायुतीच्या उमेदवाराला समस्त हिंदू बांधवांनी मतदान करावं असं आवाहन केलं आहे. मात्र याच मुद्द्यावरुन आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये राज ठाकरेंवर टीका केली आहे. 


राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी पुण्यात घेतलेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी धार्मिक मुद्द्यालाला हात घालत मोहोळ यांना हिंदूंनी मतदान करावं असं आवाहन केलं. "जे सुज्ञ मुसलमान आहेत ते फतव्यांना जुमानत नाहीत पण काँग्रेसला, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा म्हणून मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये फतवे निघत आहेत," असा दावा राज ठाकरेंनी. "मुस्लिम समाजाला तुम्ही काय गुरं-ढोरं समजता का? त्यांना स्वतःचा विवेक नाही का ? त्यांनाही समजतंय कोण आपल्याला वापरून घेत आहेत. मशिदींमधून महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी फतवे काढले जात असतील तर आज हा राज ठाकरे फतवा काढतोय, "तमाम हिंदू माता-भगिनी-बांधवांसाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा," असं राज ठाकरे म्हणाले.


राऊत यांना काय प्रश्न विचारला?


मशिदींमधून महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी फतवे काढले जातात असं राज ठाकरेंनी पुण्यातील सभेमध्ये म्हटलं आहे. तसेच मी फतवा काढतो की हिंदूंनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावं असं राज म्हणालेत, असा संदर्भ देत राऊत यांना पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर राऊत यांनी, "काढा, काढा फतवा काढा," असं म्हणत उत्तर दिलं.


नक्की वाचा >> माझे अजित पवारांशी अनेक मतभेद असतील पण शरद पवारांसोबत असतानाही.. : राज ठाकरे


बाळासाहेबांच्या आत्म्याला वेदना


राज ठाकरेंच्या या वागण्याने प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला वेदना होत असतील असंही राऊत म्हणाले. "ते (राज ठाकरे) फतव्यांकडे वळले आहेत. काही नेते आणि काही पक्ष यांची दखल घ्यावी अशी महाराष्ट्राची स्थिती नाही," असा टोला राऊत यांनी मनसेला लगावला. "महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची मोठी लढाई सुरु आहे. देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात आलेलं असताना हिंदू, मुस्लमान, ख्रिश्चन, जैन, बुद्ध सर्व जाती-धर्माचे लोक रस्त्यावर उतरू इच्छित आहेत. संविधानाच्या माध्यमातून सत्तापरिवर्तन करु इच्छित आहेत. त्याच वेळेला राज ठाकरेंसारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि माननीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती वेदना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी," असं राऊत म्हणाले.


नक्की वाचा >> 'मोदींच्या काळात ‘हिंदू खतरे में’ असेल तर..', ठाकरेंचा टोला! म्हणाले, 'आगलाव्या पक्षांनी..'


ज्या ठाकरे परिवाराने


"ज्या ठाकरे परिवाराने महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी, निर्मितीसाठी आणि स्वाभिमानासाठी आपलं संपूर्ण जीवनाचं समर्पण केलं, मराठी माणसाला ताकद दिली. त्याच कुटुंबातील ही व्यक्ती महाराष्ट्रावर औरंगजेब वृत्तीने चाल करुन येणाऱ्यांना मदत करु इच्छित असतील तर मला असं वाटतं प्रोबधनकार ठाकरे असतील किंवा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पवित्र आत्मा अस्वस्थ झाला असेल,"  असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.