नाशिक : गुजरात, आंध्रप्रदेश सारखी राज्ये आज सर्व बाबतीत पुढे चालली आहेत. मुकेश अंबानी यांच्यासारखे अनेक उद्योजक राज्यात आहेत. त्यांच्यामुळे लोकांना रोजगार मिळतोय. राज्याला कर मिळतोय. त्यातून हे राज्य चालतंय, असा टोला केंद्रीय सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातल्या महाविकास आघाडीने शेती, विकास, नवीन योजना, उद्योग यांच्यासाठी काय केले? राज्यात एकही उद्योग देता येत नाही. ते इतर राज्यात उद्योग जात आहे. महाराष्ट्रात अडीचशे कोटींचे उद्योग येणार होते. त्यासाठी बैठक घ्या असे सांगूनही आघाडी सरकारचे मंत्री बैठक घ्यायला तयार नाहीत, असा आरोप राणे यांनी केला.


राज्यात उद्योग आले पाहिजेत. त्यात राजकारण होऊ नये. मी नगरसेवक होतो, प्रशासनासोबत काम केलं आहे.  पण, विकास करत असताना मी कुठेही पक्ष बघत नाही. प्रत्येकाला न्याय द्यायचा हे माझे काम आहे. 


राज्यात, देशात विकासकामे करताना राजकारणचे जोडे नेहमी बाहेर असले पाहिजे. केवळ राणे आहे म्हणून विरोध असे नको. विकासाला जात धर्म नसतो. पण, विकासाला विरोध करणारा पक्ष म्हणून मी शिवसेनेचे नाव घेईन, असे नारायण राणे म्हणाले.