अयोध्येत रामलल्लासाठी सेलिब्रिटींची गर्दी! सचिनही निघाला `या` सेलिब्रिटीचा फॅन; काढला सेल्फी
नरेंद्र मोदींनीही प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी या सोहळ्याला उपस्थित होते.
मुकेश अंबानींचं संपूर्ण कुटुंब या सोहळ्याला हजर होतं. यामध्ये मुलगा आकाश अंबानी आणि लेकीचाही समावेश होता.
गायक शंकर महादेवन यांनी इतर सेलिब्रिटींबरोबर काढलेला हा सेल्फी चर्चेत आहे.
बॅटमिंटनपटू सायना नेहवाल आणि माजी महिला क्रिकेटपटू मिथाली राजही या सोहळ्याला हजर होत्या.
भारतीय संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा आणि त्याची आमदार पत्नी रिवाबा हे सुद्धा या सोहळ्याला हजर होते.
जडेजाच नाही तर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे सपत्नीक या सोहळ्याला हजर होता.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सुरपस्टार रजनिकांतबरोबर सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.
अभिनेत्री कंगणा राणौतही या सोहळ्याला हजर होती. तिचा 'जय श्री राम'च्या घोषणा देणारा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन ही पिता-पुत्राची जोडीही या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिली होती.
अमिताभ बच्चन यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.
अभिषेक बच्चननेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.
दाक्षिणात्य अभिनेता रामचरण, चिरंजिवीही या सोहळ्याला उपस्थित होते.
आयुषमान खुराना, आलिया भट्ट, विकी कौशल यांच्यासहीत अनेक सेलिब्रिटी या सोहळ्याला उपस्थित होते.
उद्योक कुमार मंगलम बिर्लाही या सोहळ्याला उपस्थित होते.