Chanakya Niti : `या` तीन गोष्टींवर बिनधास्त उधळा पैसै, कधीच रिकामा राहणार नाही खिसा!
चाणक्यांनी नितिमत्तेपासून आर्थिक लाभावर देखील लिहून ठेवलं आहे. आयुष्यात यशस्वी आणि धनाढ्य व्हायचं असेल तर काही गोष्टी फॉलो कराव्या लागतील.
माणसाने तीन गोष्टींवर बिनधास्त खर्च केल्याने तुमचा खिसा कधीच रिकामा राहणार नाही. चाणक्यांनी अशी कोणत्या तीन गोष्टी सांगिल्यात?
माणसाने मोठ्या मनाने दान केलं पाहिजे. गरजू लोकांची मदत केल्याने तुमच्यावर लक्ष्मीची कृपा असते, असं चाणक्य म्हणतात.
धर्मच्या कार्यात देखील माणसाने आपलं योगदान द्यायला हवं. दानधर्म करणार किंवा गरिबाची मदत करताना कधीही स्वत:चा विचार करू नये, असंही चाणक्यांनी म्हटलंय.
तसेच, सामाजिक कार्यात नेहमी भाग घ्यावा. समाजाच्या कल्याणासाठी पैसे खर्च करता आले तर मागेपुढे पाहू नये, असं चाणक्यांनी सांगितलं आहे.