कोविशील्ड लस भारतानंतर आता ब्रिटनला जाणार ?
कोविशील्ड लस भारतानंतर आता ब्रिटनला जाण्याची शक्यता आहे. ब्रिटन आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य व्यापार आणि सबंधावर पुण्यात महत्वाची भेट झाली.
सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावला यांनी ट्विट करत माहिती दिली. ब्रिटनच्या व्यापार राज्य सचिव trussliz आणि एक प्रतिनिधिमंडळ यांनी सिरमला भेट दिली.
भारत आणि ब्रिटन यांच्यामधील आरोग्य संबंधात उत्पादन व नाविन्यपूर्ण विद्यमान संबंध कसे वाढवायचे यावर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीमुळे जगभरात चर्चेत आली आहे. ब्रिटनलाही लवकरच कोविशील्ड लस जाण्याची शक्यता त्यामुळे आता या भेटीमुळे वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नंतर प्रथमच परदेशातील महत्वाच्या व्यक्तीने सिरमला भेट दिली आहे.