PHOTO : ना शाहरुख, ना सलमान... `या` स्टारच्या प्रेमात वेड्या होत्या तरुणी; आलिशान घर आणि कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक
आम्ही बोलत आहोत मॅडी...होय रेहना है तेरे दिल में या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आलेला आर माधवन यांनी तरुणींचं मनं जिंकलं होतं. हा चित्रपट जरी फ्लॉप झाला तरी या मॅडीची आजही चर्चा होते.
जमशेपूर बिहार इथे आर माधवनचा जन्म झाला. तामिळ ब्राह्मण कुटुंबातील माधवनला तामिळ, हिंदी, इंग्रजी आणि बिहारी भाषा चांगली येते. माधवनने कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमधून बीएससीची पदवी घेतली आहे.
पब्लिक स्पीकिंग शिकत असताना, माधवनची सरिता बिर्जला भेट झाली आणि 8 वर्षांच्या प्रेमसंबंधनंतर 1999 मध्ये त्यांनी लग्न केलं.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, माधवनला सैन्यात भरती होण्याची संधी मिळाली होती, पण तो 6 महिन्यांने लहान असल्याने त्याला सहभागी होता आलं नाही.
माधवन याचा पहिला चित्रपट 1993 मधील यूल लव्ह स्टोरी होता. तर तो 'अपनी बात बनेगी' आणि 'घर जमाई' या मालिकेतीही झळकला.
आर माधवन चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करतो. तो एका चित्रपटासाठी 6 ते 8 कोटींचं मानधन आकारतो. कॅमिओ, रिॲलिटी शो आणि सोशल मीडियातून तो पैसे कमावतोय.
त्यांची एकूण संपत्ती ही 115 कोटी रुपयांची असून चेन्नईमध्ये 18 कोटी आणि मुंबईत त्याचं आलिशान घर आहे.
आर माधवनचे कारचे कलेक्शन असून 80 लाख किमतीची मर्सिडीज बेंझ आणि 1 कोटी रुपयांची रेंज रोव्हर, 40 लाख रुपयांची रोडमास्टर क्रूझर, 27 लाख रुपयांची यामाहा व्ही-मॅक्स, 28.3 लाख रुपयांपासून सुरू होणारी BMW K1600 GTL आणि Duca सारख्या बाइक्स 17.9 लाख रुपये किमतीचे डायवेल आहे.
माधवनच्या एकूण संपत्तीत भर घालणारी दुसरी सर्वात महागडी गोष्ट म्हणजे त्याच्याकडे खाजगी नौका आहे. त्याने ही बोट चालवण्यासाठी रितसर परीक्षा दिली आहे.