अजाणतेपणेही करु नका `या` चुका; नाहीतर येईल Income Tax विभागाची नोटीस

Wed, 10 Jul 2024-8:20 am,

Income Tax Return File : तुम्हाला माहितीये लहानशी चूकही तुम्हाला Income Tax विभागाची नोटीस मिळण्याच्या संकटात लोटू शकते. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चुकीच्या फॉर्मची निवड. उत्पन्नाच्या आकडेवारीनुसार करदात्यांना फॉर्म उपलब्ध करून दिले जातात, त्यामुळं योग्य फॉर्म निवडणं महत्त्वाचं. 

 

जमीन खरेदी, मालमत्ता आणि तत्सम माहिती शेड्यूल एएल अंतरग्त दिली जाणं महत्त्वाचं असून असं न केल्यास रिटर्न अपूर्ण ग्राह्य धरलं जातं. 

 

आपात्कालीन भांडवली नफा आणि दीर्घकालीन नफा यांच्यामधील फरक लक्षात न आल्यामुळे अर्ज भरताना चुका होतात आणि यावेळी नोटीस येऊ शकते. 

 

परदेशी मालमत्ता, संपत्ती आणि गुंतवणुकीतून होणाऱ्या उत्पन्नाची माहिती व्यवस्थित न दिल्यास याची चौकशी होऊ शकते. 

 

तुमचा अर्ज आणि फॉर्म 26 एएसमधील माहिती न जुळल्यास आयकर विभाग चौकशीसाठी तुम्हाला नोटीस बजावू शकतो. 

 

अर्ज दाखल करताना पॅन कार्ड, पत्ता, आधार कार्ड क्रमांक चुकीचा भरल्यास आयकर विभागाकडून चुकीची माहिती पुरवल्याअंतर्गत नोटीस पाठवली जाऊ शकते. 

 

आयटीआर दाखल करण्यास दिरंगाई केल्यास किंवा मुदतीनंतर भरल्यास तो अवैध मानला जातो आणि अशा प्रसंगी नोटीस येण्याची शक्यता असते. 

 

आयटीआर भरताना अनेकदा बँकेच्या दुसऱ्याच खात्याचा क्रमांक दिला जातो आणि अशा वेळी परताव्याची रक्कम खात्यात येण्यास अडचणी निर्माण होतात. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link